Breaking

रविवार, २६ ऑक्टोबर, २०२५

*जयसिंगपूर कॉलेजची विद्यार्थिनी अग्रजा कांबळे हिची नॅशनल अँडव्हेचर कॅम्पसाठी निवड*

 

अग्रजा भिमराव कांबळे,(राष्ट्रीय सेवा योजना )जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर 

*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर, ता. २५ : जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथील राष्ट्रीय सेवा योजनेची (एन.एस.एस.) विद्यार्थिनी अग्रजा भिमराव कांबळे हिची  हिमाचल प्रदेश मधील धर्मशाळा येथे २४ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत होणाऱ्या नॅशनल अँडव्हेचर कॅम्पसाठी निवड झाली आहे.

        अग्रजा कांबळे हिचा विविध कॅम्प मधील सक्रिय सहभाग, सामाजिक अनुभव, कार्यतत्परता, धाडस आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर ही निवड झाली आहे. 

    या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सहासवृत्ती, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी हे शिबिर आयोजित केले जाते.या शिबिरात देशभरातील निवडक एन.एस.एस. स्वयंसेवकांना सहभागी होण्याची संधी दिली जाते. हा राष्ट्रीय कॅम्प युवक व क्रीडा मंत्रालयाच्या अधिपत्याखाली आयोजित केला जातो. या कॅम्पमध्ये ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग, वॉल क्लाइंबिंग, रिव्हर राफ्टिंग आणि इतर साहसी खेळांचे  प्रशिक्षण दिले जाते. तसेच सामाजिक जागरूकता व पर्यावरण संवर्धन याविषयी विविध चर्चासत्रे, आपत्कालीन परिस्थितीत नेतृत्व प्रशिक्षण, प्राथमिक उपचार प्रशिक्षण व सांस्कृतिक सामाजिक संवाद कार्यक्रम आयोजित केला जातो.

    या निवडी मागे शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे,  राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ.टी. एम. चौगले, संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे आणि प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व सुजित मुंढे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

    तसेच एन.एस.एस. चे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर माने आणि प्रा.डॉ. खंडेराव खळदकर, अधीक्षक संजय चावरे  यांनीही तिच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले. अग्रजा कांबळे हिच्या या निवडीबद्दल महाविद्यालय तसेच स्थानिक पातळीवर सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा